जीम, व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी ; एसओपी चे काटेकोरपणे पालन करा - मुख्यमंत्री ठाकरे| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, October 17, 2020

जीम, व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी ; एसओपी चे काटेकोरपणे पालन करा - मुख्यमंत्री ठाकरे| C24TAAS |

जीम, व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी ; एसओपी चे काटेकोरपणे पालन करा - मुख्यमंत्री ठाकरे| C24TAAS |
करोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले. जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी करोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टीम बाथ, सोना बाथ, शॉवर, झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की करोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण उपकरणे, सुविधा म्हणजे रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स, रुग्णवाहिका या यापूर्वीच आपण पुरेश्या संख्येने उपलब्ध केल्या आहेत. त्या आणखीही वाढविता येतील. पण त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, परिचारिका असे चांगले मनुष्यबळ उभे करणे अवघड होते. त्यामुळे विषाणू संसर्ग आटोक्यात येतो आहे, असे दिसतानाच, संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जीम, व्यायामशाळांसाठी ‘एसओपी’ तयार केली आहे आणि तिचे पालन होणे आवश्यक आहे. या 'एसओपी'चे पालन करण्याची जबाबदारी जीम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या 'एसओपी'चे काटेकोरपणे पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share

No comments:

Post a Comment