प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापूर
राजगुरूनगर : साधी राहणी उच्च विचार असे खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे (वय ५५) यांचा आज (ता. 10 ऑक्टोबर) कोरोनामुळे मृत्यू झाला. गेली काही दिवस ते कोरोनाचा संसर्ग झाल्याने आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात गेली २५ दिवासांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.
सुरेश गोरे यांनी चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य, तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. गोरे हे 2014 ते 2019 या दरम्यान ते खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार होते. शांत, संयमी, मितभाषी असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना 2009 मध्ये खेडची उमेदवारी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ती रद्द करण्यात आली होती. सन 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार झाले होते.सर्वसामान्य माणासाची असलेले सलोखा वाखाणण्याजोगा होत त्यांनी अल्पविधी मध्ये आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांना आपलास केले होत चाकण राजगुरूनगर मध्ये "भाऊ" या नावाने ते जास्त प्रचलित होते सर्वसामान्याच्या मनात ते नेहमी कायम राहतील "माळी समाजासाठी त्याचे मोठे योगदान आहे समाजच्या हितप्रति ते नेहमी अग्रेसर असत अशा सुरेशभाऊच्या जाण्यांना आज मोठी पोकळी निर्माण झाली आहे
सुरेश गोरे यांच्या निधनामुळे राजगुरुनगर तालुक्यातील सच्चा शिवसैनिक आपल्यातुन हरपल्याने कार्यकत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.अगदी तळागाळापर्यंत संपर्क असलेले सुरेश गोरे आपल्यात नाही यावर माझा विश्वासच बसत नाही असे राजगुरूनगरचे उघोजक चेतन गायकवाड यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment