पुणे -खेड तालुक्याचे माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे दुःखद निधन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, October 9, 2020

पुणे -खेड तालुक्याचे माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे दुःखद निधन


खेड तालुक्याचे माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे दुःखद निधन प्रतिनिधी - स्वप्निल जाधव मंचर


खेड तालुक्याचे माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे दुःखद निधन


खेड तालुक्यातील शिवसेनेचे प्रथम आमदार सुरेश नामदेव गोरे (वय ५७ ) यांचे आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी पुण्यातील रुबी हॉल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे त्यांना कोरोना संसर्ग झाल्यापासून मागील वीस दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते .त्यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला होता .”भाऊ” या टोपण नावाने ते सर्व परिचित होते .एक संयमी नेतृत्व म्हणून भाऊंची ओळख खेड तालुक्याला होती.राजकारणात प्रवेश केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या भाऊंनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले होते .आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचे विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी 30 हजारांवर मतांनी सुरेश गोरे यांनी दिलीप मोहिते-पाटील यांना मात दिली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेचा पहिला आमदार होण्याची नोंद झाली. विरोधकांनावर संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा ,कार्यकर्त्यांच्या गराड्यात कायम असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने खेड तालुक्यात शोककळा पसरली ,असून मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment