राहुरी - केके रेंजच्या सरावासाठी अधिसूचना होणार जाहीर. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, October 8, 2020

राहुरी - केके रेंजच्या सरावासाठी अधिसूचना होणार जाहीर.

राहुरी - केके रेंजच्या सरावासाठी अधिसूचना होणार जाहीर.


( राहुरी प्रतिनिधी - मनोज साळवे ) राहुरी तालुक्यातील शेतकरी वर्ग केके रेंज 2 करीता जमिनीचे भूसंपादन होणार म्हणून चिंतेत होता.मात्र आज जिल्हाधिकारी,संरक्षण विभागाचे कर्नल व राहुरी,नगर व पारनेर तहसीलदार यांच्या झालेल्या बैठकीत संरक्षण विभागाचा सदर भागातील क्षेत्र भूसंपादन करण्याचा कोणताही मानस नसल्याचे कळवल्याने भूसंपादन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.आज अखेर जी भूसंपादनाची चर्चा सुरू होती ती फक्त संरक्षण अधिकारी यांनी गावांना दिलेल्या भेटीमुळे व तहसीलदार राहुरी यांना जमिनीचे व इतर मालमत्तांचे मूल्यांकन मागितल्याने होत होती.मात्र सदर ची माहिती व भेटी या फक्त सराव करताना येऊ शकणाऱ्या अडचणी समजून घेण्याकरीता होत्या हे संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. खासगी जमीनीचे अधिग्रहण होणार नाही शासकीय पातळीवर तसला कुठलाही प्रस्ताव नाही.फक्त यापुर्वीचा जो अध्यादेश दर पाच वर्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारीत होतो की जो लष्कराच्या सरावाविषयी अधिनियम १९३८ (१९३८ च्या ५मधील कलम ९च्या पोटकलम २) नुसार लष्कराच्या सरावासाठी पुर्वकल्पना देउन वापरला जाईल. तोच अध्यादेश जारी केला जाईल तरी नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये व त्याचप्रमाणे अफवांना बळी पडु नये.त्यामुळे आता जमीन अधिग्रहण होणार नाही ही बाब प्रशासकीय पातळीवर स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment