मंचर - एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, October 9, 2020

मंचर - एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

 प्रतिनिधी - स्वप्निल जाधव मंचर


एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग


  मंचर ' तालुका आंबेगाव येथील मंचर डायग्नोस्टिक सेंटर येथे छातीचा एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा डायग्नोस्टिक सेंटरमधील टेक्निशियनने विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


      मंचर ' तालुका आंबेगाव येथील मंचर डायग्नोस्टिक सेंटर येथे छातीचा एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा डायग्नोस्टिक सेंटरमधील टेक्निशियनने विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


    याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर अवसरी फाटा येथील महिलेचे काही दिवसांपासून अंग दुखत होते तसेच ताप येत असल्याने ती मंचर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. तेथे डॉक्टरांनी महिलेला कोरोणा ची टेस्ट व छातीचे एक्स-रे काढण्यासाठी मंचर डायग्नोस्टिक सेंटर यांची पावती दिली होती. त्यावेळी संबंधित महिला आपल्या पतीबरोबर दि.२२/९/२०२० रोजी मंचर येथील डायग्नोस्टिक सेंटर येथे गेले होते. त्यावेळी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करणाऱ्या टेक्निशियन याने महिलेच्या पतीला बाहेर थांबवुन महिलेला एक्स-रे काढण्यासाठी आतमधील खोलीत एक्स-रे मशीन समोर उभे राहण्यास सांगितले त्यावेळी त्याने  महिलेला मिठी मारत तिच्या पाठीला व पोटाला हात लावला तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी संबंधित महिला त्याला ढकलून बाहेर आली. महिला घाबरलेली असल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितलं नाही मात्र दुसऱ्या दिवशी तिने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितल्यानंतर महिलेने व तिच्या पतीने दि.२६/९/२०२० रोजी डायग्नोस्टिक सेंटर येथे जाऊन घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला असता डॉक्टरांनी टेक्निशियन ला बोलावून घेत या प्रकाराबाबत विचारले असता त्याने मी काहीही केलेले नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले त्यावेळी त्या व्यक्तीचे नाव व पत्ता विचारला असता डॉक्टरने त्याचे नाव नागेश काळे ( राहणार  ढोबी मळा मंचर ,ता.आंबेगाव जिल्हा पुणे ) असे सांगितले त्यानंतर संबंधित महिलेने व तिच्या पतीने नातेवाईक यांच्याशी चर्चा करून संबंधित व्यक्ती विरोधात मंचर पोलीस ठाण्यात आज दिनांक ८/१०/२०२० रोजी फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हीले करत आहेत.

No comments:

Post a Comment