पारनेर - पारनेर तालुक्यातील रुई चोंडा धबधबा येथे दि. २५ रोजी एकच्या सुमारास १८ वर्षीय तरुण आंघोळ करत असताना धबधब्याजवळ खड्ड्यांमध्ये पडून बुडाला - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, October 27, 2020

पारनेर - पारनेर तालुक्यातील रुई चोंडा धबधबा येथे दि. २५ रोजी एकच्या सुमारास १८ वर्षीय तरुण आंघोळ करत असताना धबधब्याजवळ खड्ड्यांमध्ये पडून बुडाला


 पारनेर -  पारनेर तालुक्यातील रुई चोंडा धबधबा येथे दि. २५ रोजी एकच्या सुमारास १८ वर्षीय तरुण आंघोळ करत असताना धबधब्याजवळ खड्ड्यांमध्ये पडून बुडाला होता त्याचा मृतदेह दि.२७ रोजी १२ च्या सुमारास पाण्यातून बाहेर येऊन तेथेच पोलिसांना सापडला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रेयश नवनीत जामदार वय १८ वर्षे राहणार शिरूर घोडनदी तालुका शिरूर जिल्हा पुणे व त्याचे पाच मित्र यांनी सोशल मीडियावर रुई चोंडा धबधबा त्याचे फोटो पाहून ते लोकांना विचारत आज २५ रोजी १:३० वा. रुई चोंडा धबधबा येथे फोटो काढण्यासाठी आले होते.या ठिकाणी ते अंघोळ करत असताना त्यांच्यापैकी श्रेयश जामदार वय १८ वर्ष हा धबधब्या जवळ असलेल्या खड्ड्यामध्ये पडल्याने बुडाला धबधब्याच्या खाली असणारा तो खड्डा जवळपास ५० ते ६० फूट खोल आहे व त्या खड्ड्याच्या आत मध्ये रांजणखळगे प्रमाणे आकार असल्याने मृतदेह कुठेतरी कपारीला अडकला असण्याची शक्यता होती त्या दृष्टीने पोलीस तपास करत होते धबधब्यापासून काही अंतरावर पोलिसांनी मृतदेह आवडण्यासाठी झाडे व दोरखंड बांधले होते तसेच पोलिस तेथे २४ तास नजर ठेवून असल्याने ४६ तासानंतर मृतदेह पाण्याबाहेर आला. त्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पथकासह पुढील कार्यवाही करत आहेत

दरम्यान महिनाभरापूर्वी रूईचोंडा धबधबा येथे नगर येथील रेल्वे पोलिस बुडाला होता त्यानंतर त्याचा मृतदेह काही दिवसांनी तेथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सापडला त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे मात्र यामध्ये हा तरुण खड्ड्यांमध्ये बुडाल्यानंतर ४६ तासानंतर मृतदेह वर आला नवीन बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना हा धबधबा आकर्षित करीत आहे मात्र जवळच मोठा खड्डा आहे हे नवीन पर्यटकांना माहित नसते त्यामुळे सेल्फी काढण्याच्या नादात हे पर्यटक या खड्ड्यांमध्ये जातात व अशाप्रकारे मृत्यू होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment