नेवासा तालुक्यातील कौठा येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्या प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल ; चाईल्ड लाइनची महत्वाची भुमिका.
नेवासा तालुक्यातील कौठा येथील एका अल्पवयीन मुलीचा श्रीरामपुर तालुक्यातील एका गावात बालविवाह लावल्यानंतर मुलीच्या आईने चाईल्ड लाइन(नगर) च्या मदतीने सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कौठा व औरंगाबाद येथील अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या आईने फिर्याद दिली की,माझे पती दारु पेवून मारहाण करत असल्याने मी एक वर्षापूर्वी एक मुलगा व दोन मुलीसह बहिणीकडे राहत होते.सहा महिन्यापूर्वी पती तीनही मुलांना दमदाटी करुन कौठा या गावी घेवून गेले होते.१४ ऑक्टोबर रोजी त्यांनीच मुलीच्या विवाहाबद्दल माहिती दिल्यानंतर मी चाईल्ड लाइनला बालविवाहाबाबत माहिती दिली.'चाईल्ड' चे प्रविण कदम व पुजा पोपळघट यांनी गुन्हा दाखल साठी विशेष परिश्रम घेतले.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन वडील सुनिल मधुकर चक्रनारायण,उषा मधुकर चक्रनारायण,मधुकर पांडुरंग चक्रनारायण,रविंद्र मधुकर चक्रनारायण,सोनाली रविंद्र चक्रनारायण,अनिल मधुकर चक्रनारायण,सविता अनिल चक्रनारायण(सर्व राहणार-कौठा) विशाल नंदु भालशंकर,नंदु बबन भालशंकर,संगिता नंदु भालशंकर(सर्व राहणार-औरंगाबाद) सह मुलाचे आजी,आजोबा व तिन मामा आणि तीन मामी अशा अठरा जणांवर भारतीय दंड संहिता १८६० व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-२००७ कलम ९,१०,११,३२३,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रभारी पोलिस निरीक्षक वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आमलदार अंकुश दहिफळे अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment