राहुरी - महिला व अत्याचार निवारण समितीत कु.सुनंदा दहातोंडे यांची निवड. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, October 19, 2020

राहुरी - महिला व अत्याचार निवारण समितीत कु.सुनंदा दहातोंडे यांची निवड.

 राहुरी - महिला व अत्याचार निवारण समितीत कु.सुनंदा दहातोंडे यांची निवड.

( राहुरी, प्रतिनिधी मनोज साळवे ) - अन्याय अत्याचार रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी निर्णय घेवून त्यावर कार्यवाही करत असते याचाच एक भाग म्हणून समाजातील महिलावर्गाबरोबरच शासकीय कार्यालये व आस्थापनांमधील महिलांवरिल लैंगिक अत्याचार व होणारे शोषण रोखण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे पारीत शासन निर्णयानुसार कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यालया अंतर्गत तक्रार समिती गठीत करणेबाबत जिल्हाधिकारी यांच्या पत्रातील आदेशान्वये राहुरी तालुक्यात तहसिलदार फसियोद्दीन शेख यांनी समिती गठीत केली असून यात महसुलच्या वरिष्ठ महिला अधिकारी नायब तहसिलदार श्रीमती पी.एम.दंडीले यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे तर सदस्यपदी महसुलच्या राहुरी मंडलाधिकारी श्रीमती.व्ही.एम.सोनवणे,श्रीमती अभया राजवळ,मल्हारवाडीच्या तलाठी संध्या गाडकर,तर राहुरी नगरपरिषदेच्या समुदाय संघटक सुनंदा दहातोंडे यांची नियुक्ती झाली आहे तर  सदस्य सचिव म्हणून राहुरीच्या तलाठी कार्यालयातील लिपीक श्रीमती एस.ए.वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे.सदर समिती ही तीन वर्षासाठी गठीत करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment