राहुरी येथील अमृत उदावंत या सराफ व्यापाऱ्याला व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई येथील पोलिस पथकाने पकडून गजाआड केल्याची घटना दिनांक १० ऑक्टोबर रोजी घडली आहे.
दिनांक १० ऑक्टोबर रोजी राहुरी पोलिस ठाण्यात मुंबई येथील पोलिस पथक हजर झाले. आणि त्यांनी राहुरी शहरातील अमृत विश्वास उदावंत या सराफ व्यापाऱ्यांची चौकशी केली. तसेच राहुरी पोलिसांची मदत घेऊन शहरामध्ये सापळा लावून अमृत उदावंत या सराफ व्यापाऱ्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. आणि मुंबई येथे घेऊन गेले. अमृत विश्वास उदावंत या सराफ व्यापाऱ्याचे राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरात सोन्याचे दुकान आहे. काही वर्षापूर्वी अमृत उदावंत याने मुंबई येथील एका सराफ व्यापाऱ्यांकडून उधारीवर सोने विकत घेतले होते. सदर व्यापाऱ्याने वारंवार चकरा मारून देखील उदावंत याने त्याच्या मालाची रक्कम परत केली नाही. अखेर त्या व्यापाऱ्याने पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटने बाबत मुंबई येथील सराफ व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून वि. प. मार्ग पोलिस ठाणे, मुंबई. येथे गुन्हा रजि. नं. २८७१/२०२०. भादवि कलम ४०६, ४०९, ४२० व ५०६ प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
No comments:
Post a Comment