निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला अद्याप त्याचा शोध नाही .
पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
दर्शन घेउन परतलेल्या महिलांनी रिक्षाजवळ रिक्षाचालक इसाक नसल्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता पाण्यामध्ये एक तरूण पडल्याची माहीती त्यांना समजली . हातपाय धुण्यासाठी जातो म्हणून सांगून गेलेला इसाक पाण्यात बेपत्ता झाला असावा याचा अंदाज महिलांना आला . त्यांनी रांजणगांव गणपती येथे त्यांच्या तसेच इसाक याच्या नातेवाईकांशी संपर्क करून दुर्घटनेची माहीती दिली . स्थानिक नागरीकांनी पारनेर पोलिसांना कळविल्यानंतर पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी , उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . इसाक याचे नातेवाईकही तेथे तात्काळ पोहचले होते .नवरात्रीनिमित्त फराळाचे सामान दिल्यानंतर तिघा महिलांना घेउन इसाक पुन्हा रांजणगांव गणपती येथे निघाला होता . घरी परतताना नवरात्रीचे औचित्य साधून निघोजमध्ये तिघींनी मळगंगा देवीचे दर्शन घेतले . पुढे नगर व पुणे जिल्हयाच्या हद्दीवर असलेल्या निघोज कुंड येथील देवीच्या दर्शनासाठीही या महिला थांबल्या .महिला कुंडावरील मंदीरात दर्शनासाठी गेल्यानंतर जवळून वाहणाऱ्या कुकडी नदीच्या पुरामध्ये हातपाय धुण्याचा मोह इसाक यास आवरला नाही . नदीच्या तिरावर जाउन तो हातपाय धुत असताना शेवाळावरून पाय घसरून तो पाण्यात पडला . तेथील प्रत्यक्षदर्शीनी ते पाहिले . आरडाओरडा झाल्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे धावूनही गेले परंतू पाण्याच्या प्रचंड वेगामुळे काही क्षणात इसाक दिसेनासा झाला .कुकडी नदीस आलेल्या पुरामध्ये हात पाय धुण्यासाठी गेलेल्या इसाक रहेमान तांबोळी या ३५ वर्षीय तरूणाचा १८ तास उलटल्यानंतरही शोध लागू शकलेला नाही . रात्री उशिरा थांबविण्यात आलेले शोध कार्य सकाळी सुरू करण्यात आले असले तरी निघोज कुंडावरील रांजणखळगे , कपाऱ्या तसेच पाण्याचा प्रचंड प्रवाह यामुळे शोधकार्य करायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे .
No comments:
Post a Comment