मुळा उजवा कालवा नाला क्र 45 गुप्त पुलाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करा - नामदार शंकरराव गडाख - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, October 3, 2020

मुळा उजवा कालवा नाला क्र 45 गुप्त पुलाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करा - नामदार शंकरराव गडाख

मुळा उजवा कालवा नाला क्र 45 गुप्त पुलाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करा - नामदार शंकरराव गडाख
नेवासा - मुळा पाटबंधारे घोडेगाव उपविभाग अंतर्गत मौजे कौठा शिवारात मुळा उजवा कालवा सुपर पॅसेज नाला क्रमांक 45 गुप्तपुलाचे काम मागील दोन वर्षांपूर्वी निकृष्ट दर्जाचे झालेले होते. चालू वर्षी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे गुप्तपुलाची संरक्षक भिंत तुटली कॅनॉलचा पुल व भराव वाहून गेला. सदर काम झाल्याशिवाय पुढील रोटेशन सोडणे शक्य नव्हते कौठा व परिसरातील ग्रामस्थांनी या विषयी माननीय नामदार शंकरराव गडाख यांना निवेदन देऊन पुलाचे व भरावाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली होती. त्याबाबत माननीय नामदार शंकरराव गडाख यांनी पाटबंधारे विभागाकडे तातडीने पाठपुरावा केला व आज समक्ष पाहणी करून नाला क्रमांक 45 (गुप्तपुलाच्या) दुरुस्तीच्या कामाबाबत पाटबंधारे नाशिक विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्याशी चर्चा करून 24. 79 लाख रुपये खर्चाच्या पुल दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन केले.
मुळा उजवा कालवा गुप्तपुलाचे 24. 79 लाख रुपयाचे व भराव दुरुस्तीचे 24.33 लाख रुपये खर्चाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. याप्रसंगी अलका आहिरराव अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक, सायली पाटील कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर, पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी पाटील जावळे, जिल्हा परिषद सदस्य अनिल अडसुरे कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी यांच्यासह कौठा, चांदा, देडगाव व परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment