पाचेगाव येथील १ जण प्रवरा नदीपात्रात वाहून गेला. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, September 9, 2020

पाचेगाव येथील १ जण प्रवरा नदीपात्रात वाहून गेला. | C24TAAS |

पाचेगाव येथील १ जण प्रवरा नदीपात्रात वाहून गेला. | C24TAAS |
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी वय ५७ वर्षे ही व्यक्ती प्रवरा नदीत अंघोळी साठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना बुधवारी दि.९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली.गावातील युवकांकडून वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होते.
      मुळा धरणातून मुळा नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदीत पाण्याचा वेग जास्त आहे. रात्र झाल्यामुळे गुरुवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.
      सदर घटनास्थळी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तलाठी गणेश जाधव, पोलीस नाईक ज्ञानेश्वर देवकाते यांनी भेट दिली.यावेळी पाचेगावचे उपसरपंच श्रीकांत पवार यांच्या सह इतर नागरिक हजर होते.

No comments:

Post a Comment