पदभार स्वीकारण्या आधिच गेले सह्यांचे अधिकार नाहाटा गटाला धक्का ।पदअधिकारी राहणार नामधारी..C24TAAS
श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा तालुका खादीग्रामउदयोग संघाच्या अध्यक्ष पदाच्या काल झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घाडमोडित अखेर अध्यक्ष व उपअध्यक्ष यांना साह्याचे आधिकार न मिळून देण्यात यश आले
श्रीगोंदा तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो त्यामध्ये टोकाचा संघर्ष झाल्याशिवाय राहत नाही ..याचाच प्रत्येय
पुन्हा एकदा खादी ग्रामउद्योग संघाच्या अध्यक्ष पदाच्या निमित्ताने दिसून आले
सात सप्टेंबर रोजी बाळासाहेब नाहटा यांनी स्वतःहा निवडणूकित लक्ष घालून संघावर आपल्या विचारच्या संचालकांना एकत्र करून आपला झेंडा फडकवला होता
नाहटा गटाने अध्यक्षपद मिळविले होते परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही काल रोजी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली.या बैठकीत विरोधी गटाने सत्ताधारी गटाचे संचालक नंदू सासणे यांना आपल्या बाजूने खेचून अध्यक्ष शुभम घाडगे व उपअध्यक्ष रमजान शेख यांना सह्याचे अधिकार मिळण्यापासून दूर ठेवले.
...सत्ताधारी गाटाच्या बाजूने पाच तर विरोधी गटाकडून सहा संचालकानी वर हात करून मतदान केले ...त्यामुळे अध्यक्ष व उपअध्यक्ष यांना आपल्या पदाचा पदभार घेण्या अगोदरच सह्यांचा अधिकार गमऊन बसण्याची वेळ आली.त्यानंतर सह्याचे अधिकार नंदू सासणे व संजय शिंदे या संचालकांच्या नावावर बहुमत झाले.या निवडीत विरोधी गटाकडून नाना सासणे,अशोक शिंदे यांनी भक्कम बाजू सांभाळली.
No comments:
Post a Comment