नेवासा - प्रवरा नदीपात्रात पुन्हा एक जण वाहून गेला ;
पंधरा दिवसातील दुसरी घटना. | C24Taas |
पंधरा दिवसातील दुसरी घटना. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील इमामपूर येथील निवृत्त पोलीस कर्मचारी मधुकर दादा बर्डे वय ६१ वर्षे ही व्यक्ती प्रवरा नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. गेल्या पंधरा दिवसातील पाचेगाव प्रवरा नदीपात्रात वाहून जाण्याची ही दुसरी घटना आहे.संध्याकाळी उशिरापर्यंत कोणतेही प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
मधुकर दादा बर्डे रा.इमामपूर हा व्यक्ती पाचेगाव येथून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान इमामपूरला जात होता.पाण्याचा अंदाज न आल्याने हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.सदर व्यक्तीचा इमामपूर येथील युवक शोध घेत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ९ सप्टेंबर अशीच घटना घडून पाचेगाव येथील 1 व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती.
मुळा धरणातून नदीपात्रात सध्या मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवरेला मोठा पूर आहे.प्रवरा नदीपात्रात पाण्याचा वेगही जास्त आहे.सदर घटनेची नेवासा पोलीस ठाण्यात संध्याकाळ पर्यंत कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.
No comments:
Post a Comment