राहुरी - खुन प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, September 20, 2020

राहुरी - खुन प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी. | C24Taas |

राहुरी - खुन प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी. | C24Taas |
राहुरी शहरात धक्का लागल्याच्या  किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत संजय थोरात या ५५ वर्षीय इसमाचा जागेवरच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी शनिचौक परिसरात घडली आहे. या घटनेतील आरोपी विशाल लांडे याला राहुरी पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.
        राहुरी शहरातील बालाजी मंदिर परिसरात राहणारा विशाल संभाजी लांडे वय 26 वर्षे. हा तरुण काल दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या बोरा मेडिकल समोरून रस्त्याने जात होता यावेळी संजय सुगंधा थोरात वय वर्षे ५५, राहणार वडगाव गुप्ता ता.नगर हा इसम समोरुन येत होता दोघे पायी चालत असल्याने एकमेकाला किरकोळ धक्का लागला यावेळी लांडे व थोरात या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी विशाल लांडे हा घटनास्थळावरून निघून गेला. आणि दहा मिनिटाने हातात काठी घेऊन परत आला. यावेळी आरोपी विशाल लांडे याने रागाच्या भरात संजय थोरात या इसमाला लाथा बुक्क्याने व काठीने मारहाण केली,यावेळी थोरात याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागेवर गतप्राण झाला तर  या घटनेत विशाल लांडे हा जखमी झाला होता अशी परिसरात चर्चा सुरू आहे.
       घटनेची मिहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बागुल व यशवंत राक्षे तसेच पोलिस उप निरीक्षक निरज बोकिल, पोलिस नाईक प्रविण खंडागळे, आदिनाथ पाखरे, सागर माळी आदि पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संजय थोरात या इसमाला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी थोरात यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. यावेळी आरोपी विशाल संभाजी लांडे याला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले. या घटनेबाबत मयताचा भाऊ भाऊसाहेब सुगंधा थोरात वय ३८ वर्षे रा.वडगाव गुप्ता ता.नगर यांचे फिर्यादीवरुन आरोपी विशाल संभाजी लांडे याचे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पूढील तपास पोलिस निरिक्षक मुकूंद देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरिक्षक सचिन बागूल हे करीत आहे.
      आज दिनांक २० सप्टेंबर रोजी या घटनेतील आरोपी विशाल लांडे याला राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला २५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन खूनासारखा गंभीर गुन्हा राहुरी शहरात घडल्याने या घटनेची चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे.
 
 प्रतिनिधी - मनोज साळवे, राहुरी.

1 comment:

  1. राग नियंत्रण करता न आल्या मुळे अशा घटना घडतात

    ReplyDelete