श्रीक्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, September 19, 2020

श्रीक्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन. | C24TAAS |

श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी लाँक डाऊन मध्ये येण्याचे टाळावे.
 नेवासा - करोना या वैश्विक महामारीच्या संकटामुळे जगभर संपुर्ण जनजीवन तथा आरोग्य यंत्रणा वेठीस धरली गेलेली आहे,
संपूर्ण भारतभर वेगळ्या टप्प्यांमध्ये संपूर्ण देश हा लॉकडाऊन होता,महाराष्ट्र शासनाने देखील लॉकडाउन चे वेगवेगळे टप्पे जाहीर करत राज्यभर बंद पाळला गेला,त्यामध्येही शहरं,गावे उस्फुर्तपणे जनता कर्फ्यू पाळून बंद करण्यात आली,जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी हा यामध्ये गेला असल्याने नाईलाजास्तव करोनाचे संकट दुर झालेलं नसतांनाही व्यवहार कुठेतरी पूर्ववत होताना दिसत आहेत,
परंतू मठ,मंदिर,देवालये व ईतर धार्मिक स्थाने खुली करण्याबाबत शासनाने कुठेलेही निर्देश जारी केलेले नाही,
शासनाने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेशित केल्यामुळे श्रीदत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड ता,नेवासा येथील श्रीभगवान दत्तात्रेय मंदिर,श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीबाबा समाधी मंदिर,पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदिर व ईतर मंदिरे परिसरातील प्रसादाची दुकाने पान-फुल,नारळ त्याचप्रमाणे यात्रीनिवास,यात्रि भुवन,भक्त निवास भोजनालय,प्रसादालय पूर्णतः बंद आहेत,त्यामुळे बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी देवालय बंद असल्या कारणाने कुणीही देवगडला येऊन गर्दी करू नये,आपली गैरसोय होईल,मंदिर परिसर महाद्वारापासूनच पुर्णपणे बंद आहे,
त्याचप्रमाणे प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आहे,त्यामुळे पर्यटकांना देखील नदीपात्रालगत जाण्यास देवस्थानच्या वतीने मज्जाव करण्यात आलेला आहे,
पुरुषोत्तम मास हे हिंदू धर्मियांच्या पवित्र असा हा महिना,या कालखंडामध्ये आपण आपल्या घरूनच व्रत-वैकल्ये,उपासना करावी,
श्रीदत्त मंदिर व इतर देवालयातील नित्य पूजा-विधी,आरती हरिपाठ,श्रीमद्भगवद्गीता पाठ मंदीरात वास्तव्यास असलेले सेवेकरी- विद्यार्थी हे नित्य नियमाने करत आहेत,त्याचप्रमाने तीन वर्षांनी येणारा पुरुषोत्तम मास यावर्षी सुरु झालेला आहे,
यानिमित्ताने देवगडला मोठ्या प्रमाणावर अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन होत असते, परंतु करोनामुळे शासन निर्देशानुसार कुठलीही गर्दी जमवण्यासाठी बंदी असल्याने नेहमी होणारा अध्यात्मिक उपक्रम खंडित होवु नये म्हणून फक्त श्री क्षेत्र देवगड संस्थानचे विद्यार्थी सेवेकरी हे मंदिरातच मर्यादित अल्प संख्येत भजन, पुजन करत आहेत,याकरीता भक्तांनी कृपया देवगडला येवुन गैरसोय करुण घेवु नये, व देवस्थानला सहकार्य करावे ही विनंती,
  कृपया आपण शासन प्रशासन तथा देवस्थानला सहकार्य करत घरी रहा सुरक्षित रहा,असे आवाहन प,पुज्य,भास्करगिरी महाराजांनी केले आहे,

No comments:

Post a Comment