नेवासा - नदी काठच्या गावांना तहसीलदारांकडून सतर्कतेचा इशारा. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, September 17, 2020

नेवासा - नदी काठच्या गावांना तहसीलदारांकडून सतर्कतेचा इशारा. | C24Taas |

नेवासा - नदी काठच्या गावांना तहसीलदारांकडून सतर्कतेचा इशारा. | C24Taas |
नेवासा - आज दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी लाभ क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने मुळा धरणात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे त्यामुळे दुपारनंतर मुळा नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुळा धरणातून नदीपात्रामध्ये सायंकाळी 8:30  वाजता 20000 क्युसेक्स इतका निसर्ग सोडण्यात आला असुन,  त्यामध्ये आणखी वाढ करण्याची आवश्यकता भासल्यास निसर्ग वाढवण्यात येईल. नदी पात्रात विसर्ग सोडण्यापूर्वी सर्व खबरदारी उपाय घेण्यात आले आहेत. तसेच सर्व यंत्रणांना याबाबत माहिती दिलेली आहे.

तहसीलदार रुपेश कुमार सुराणा.
सध्या मोठ्याप्रमाणात पाऊस होत असल्यामुळे  अचानक प्रवरा नदीपात्रात मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे ,त्यामुळे आपल्या नेवासा तालुक्यातील मुळा व प्रवरा आणि गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येते आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहिती नेवाशाचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी सांगितले.
 

3 comments: