नेवासा फाटा येथे फळविक्रेते जोंधळे यांचे अपघाती निधन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, September 3, 2020

नेवासा फाटा येथे फळविक्रेते जोंधळे यांचे अपघाती निधन. | C24Taas |

नगर-औरंगाबाद महामार्गावर टेम्पोच्या निखळलेल्या चाकाचा जोराचा मार लागून युवक फळविक्रेते संदीप जोंधळे यांचे निधन.

नेवासा फाटा येथे नगर-औरंगाबाद महामार्गावर फ्रुट विक्रेते संदीप जोंधळे वय 30 यांचा गुरुवारी रात्री 09 वाजेच्या दरम्यान दुकाना समोर उभा असताना नगर कडून येणाऱ्या टेम्पोच्या निखळलेल्या चाकाचा जोराचा मार डोक्याला लागल्याने अपघात झाला उपचारासाठी नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. सेवानिवृत्त एसटी चालक बाळासाहेब जोंधळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संदीप जोंधळे यांचे गेल्या काही वर्षापासून नेवासा फाटा येथे फळाचे दुकान आहे तर यांच्या पाठीमागे आई-वडील,पत्नी दोन मुले, भाऊ-भावजाई असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती कळताच नेवासा व नेवासा फाटा येथील व्यापाऱ्यांसह मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त होत आहे. 

No comments:

Post a Comment