अहमदनगर - सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, September 3, 2020

अहमदनगर - सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहिली शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपदीत करून राष्ट्रीय स्मारक घोषित करून राष्ट्रीय स्मारक घोषित करून विकसित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना आज 3 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक समितीचे जिल्हा समनव्यक संतोष भोंदे, आकाश महाराज फुले,नितीन डागवले जिल्हा युवक काँग्रेसचे देवेंद्र कडु, लक्ष्मण दिघे उपस्थित होते
देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाडा ही वास्तू प्रसिद्ध आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहोचवली ज्या फुले दाम्पत्यांनी अडचणीचा सामना करून विरोध पुकारून देशात मुलींसाठी भिडेवाडा मधून शिक्षणाची दारे खुले करून दिले.
त्या भिडेवाड्याची आज अवस्था खूपच दयनीय झालेली आहे या ठिकाणच्या दुरवस्था होणे फुले प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक आहे तसेच त्याबाबत मा. उच्चन्यायालय खंडपीठ मुंबई येथे जे प्रकरण चालू आहे त्यामध्ये शासनाने स्वतः हजर व्हावे व ते प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर योग्य ते करावेत व ती जागा शासनाने भूसंपदीत करून फुले प्रेमी जनतेला न्याय द्यावा. अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रत सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर जनआंदोलन करण्यात येईल याची शासनाने गंभीर दखल घ्यावि अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी नेवासा येथून नगरसेवक दिनेश व्यवहारे, नगरसेवक संदीप बेहळे , श्रीगोंदा येथून विकास भुतकर ,कर्जत व जामखेड येथे संभाजी अनारसे,शेवगाव मधून नगरसेवक साईनाथ आधाट , पाथर्डी मधून नगरसेवक रमेश गोरेश्रीरामपूर मधून महेश दारूटे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले .

No comments:

Post a Comment