राहुरी तालुक्यात भरदिवसा मारहाण करत ३ लाख रुपयाला लुटले. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, September 3, 2020

राहुरी तालुक्यात भरदिवसा मारहाण करत ३ लाख रुपयाला लुटले.

राहुरी तालुक्यात भरदिवसा मारहाण करत ३ लाख रुपयाला लुटले.
राहुरी प्रतिनिधी - राहुरी शहर हद्दीत मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात तीन भामट्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तीन लाख रूपये पळविल्याची घटना दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजे दरम्यान राहुरी टाकळीमियॉ रोडवर घडली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
        राहुरी शहरातील एका बँकेत काम करणारे दोन तरूण मोटरसायकलवर सहा लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन राहुरी येथून टाकळीमियॉ येथे जात होते. सदर रक्कम ही दोन बॅगमध्ये प्रत्येकी तीन लाख रूपये ठेवली होती. सदर रक्कम ही राहुरी खुर्द येथील बॅकेतून काढली आणि टाकळीमियाॅ येथील टाटा एटीएम मध्ये भरण्यासाठी ही रक्कम घेऊन जात असताना राहुरी टाकळीमियॉ रोडवर वाघाचा आखाडा परिसरात पाठीमागून विना क्रमांकच्या मोटरसायकलवर आलेल्या तीन भामट्यांनी रक्कम घेऊन जात असलेल्या दोघांना कट मारला. आणि त्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते दोघे मोटरसायकलवरून पडले. दोघांपैकी एकाने एक बॅग घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र लूटमार करण्यासाठी आलेल्या तीन भामट्यांनी एकाला पकडून लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. आणि त्याच्याकडील तीन लाख रूपये रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. काही क्षणात घटनास्थळावरून त्यांनी टाकळीमियॉ रोडकडे धूम ठोकली. अशी माहिती मिळाली आहे.
        घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उप विभागीय अधिकारी राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस नाईक शिवाजी खरात, रवींद्र मेढे, श्रीकृष्ण केकान, महेंद्र गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन चव्हाण, प्रवीण खंडागळे आदि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अहमदनगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकातील पोलिस नाईक मिठू वैराळ, पोलिस शिपाई उमेश गोसावी तसेच रक्षा नामक श्वान यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. रक्षा नामक श्वानाने शंभर फुटां पर्यंत माग दाखवीला. आणि रस्त्यावरच घुटमळले.
         या घटनेबाबत राहुरी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सी 24 तास मनोज साळवे, राहुरी.

No comments:

Post a Comment