सांस्कृतिक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी महेश मंगरूळकर - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, September 22, 2020

सांस्कृतिक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी महेश मंगरूळकर

सांस्कृतिक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी महेश मंगरूळकर
बीड (प्रतिनिधी)
औसरमल गौतम
नन्नवरे कृष्णा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभागाच्या शिरूर (कासार)तालुका अध्यक्षपदी महेश मंगरूळकर यांची निवड झाली आहे. कला आणि मीडिया क्षेत्रात काम करणारे मंगरूळकर यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तसेच प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसद रत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत आहे.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे , विभागीय अध्यक्ष डॉक्टर सुधीर निकम आणि जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. संतोष वारे यांच्या उपस्थितीत त्यांना लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागाच्या तालुका शाखेच्या इतर पदाधिकार्‍यांची निवड लवकरच करण्यात येणार आहे.
मंगरूळकर यांनी कला आणि पत्रकारिता क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून त्यांच्या निवडीमुळे शिरूर तालुक्यात त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शिरूर तालुक्यातील चित्रपट कला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या कलावंतांना योग्य मार्गदर्शन आणि संधी प्राप्त करून देणार असल्याचे महेश मंगरूळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment