श्रीगोंदा नगरपालिका मध्ये उपनागराध्यक्ष अशोक खेंडके यांनी राजीनामा देऊन बराच कालावधी गेल्या नंतर अखेर उपनगराध्यक्ष निवडणूक होत असून या निवडणुकीत नगरपालिकेत भारतीय जनता पार्टी च्या नगरसेवकांची संख्या 11 तर राष्ट्रवादी कॉग्रेस नगरसेवक संख्या 8 आणि नगराध्यक्ष धरून एकूण 9 संख्या बळ आहे त्यामुळे पुन्हा भाजपाचा उपनगराध्यक्ष होईल आसे दिसते.
उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संग्राम घोडके ,रमेश लाढाणे, ज्योती खेडकर,मनिषा लांडे,दीपाली औटी, अनुभव पाहता शहाजी खेतमाळीस,किंवा वनिता क्षीरसागर यांची निवड होऊ शकते पण सी 24 तास न्युज चॅनल मिळल्याला माहिती नुसार उद्या नगराध्यक्षा खुर्चीवर भाजप कडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता मोठी आहे जर तसे झाले तर आघाडीवर नाव ज्योती खेडकर,मनीषा लांडे ,संग्राम घोडके ,रमेश लाढाणे,याची वर्णी लागणार अशी खास सूत्रांची माहिती आहे तर उपनगराध्यक्ष पदी निवड होण्याआधीच काहींना भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी फोन करून शुभेच्छा देयला सुरवात केली आहे अशी माहिती समजते दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस कडे नगरसेवक संख्या कमी असल्यामुळे ते या निवडणुकीत जास्त रस घेणार नाहीत त्याच्याकडे 5 वर्षसाठी नगराध्यक्ष पद आहे त्यामुळे एक कामकाजचा भाग म्हणून त्याच्याकडून कोणी तरी अर्ज दाखल करेल पण शेवटी बहुमताच्या जोरावर भाजपाचा च उपनगराध्यक्ष होणार हे नक्की
प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले
No comments:
Post a Comment