नेवासा - वारकरी शिक्षण संस्थेचे आध्यापक गुरुवर्य ह.भ.प.विठ्ठल महाराज घुलेंची पुण्यतिथी साजरी. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, September 12, 2020

नेवासा - वारकरी शिक्षण संस्थेचे आध्यापक गुरुवर्य ह.भ.प.विठ्ठल महाराज घुलेंची पुण्यतिथी साजरी.

वारकरी शिक्षण संस्थेचे आध्यापक गुरुवर्य ह.भ.प.विठ्ठल महाराज घुलेंची पुण्यतिथी साजरी.
नेवासा - आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी हजारो कीर्तनकार घडविले असे वारकरी संप्रदायातील महावैष्णव वैकुंठवाशी गुरुवर्य ह.भ.प.विठ्ठल महाराज घुले यांची पुण्यतिथी शनिवारी दि.१२ सप्टेंबर रोजी नेवासा येथे सामाजिक अंतराचे पालन करत साजरी करण्यात आली.
ह.भ.प. श्री विठ्ठलबुवा घुले महाराजांचे वारकरी संप्रदायातील कार्य स्फूर्ती व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.नंदकिशोर महाराज खरात यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.नंदकिशोर महाराज खरात यांनी किर्तनसेवा दिली.
मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प. खरात महाराज म्हणाले की वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वैकुंठवाशी ह.भ.प. विठ्ठल महाराज घुले यांनी दिलेले योगदानामुळे आज हजारो कीर्तनकार महाराष्ट्रात तयार झाले असून जे तळागाळात जाऊन संत विचार व समाजप्रबोधन करण्याचे पवित्र कार्य करीत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment