अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो.ची कार्यकारिणी जाहीर - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, September 11, 2020

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो.ची कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो.ची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी उमेर सय्यद तर सचिव लैलेश बारगजे, उपाध्यक्ष कुणाल जायकर
अहमदनगर - अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी टाइम्स नाऊ या वाहिनीचे प्रतिनिधी उमेर सय्यद तर सचिवपदी झी-24 तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान असोसिएशनच्या उपाध्यक्षांसह अन्य कार्यकारिणी सदस्यांची सुद्धा निवड यावेळी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती असोसिएशनचे सुशिल थोरात यांनी दिली.
नगरच्या शासकीय विश्रामगृहावर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मागील वर्षीचा लेखा जोखा यावेळी मांडण्यात आला. मागील वर्षी झालेल्या सर्व कार्यक्रमांची तसेच असोसिएशनच्यावतीने करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी रोहित वाळके यांनी मांडली.
असोसिएशनच्या झालेल्या बैठकीमध्ये नव्याने कार्यकारिणी निवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी निखिल चौकर यांनी उमेर सय्यद यांच्या नावाचा ठराव मांडला व सर्वानुमते तो मंजूर करुन नूतन अध्यक्षपदी उमर सय्यद यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदाकरिता साम टीव्हीचे सचिन अग्रवाल यांनी लैलेश बारगजे यांच्या नावाची सूचना मांडली व त्यास सर्वांनी अनुमोदन दिल्यानंतर दोघांची निवड जाहीर करण्यात आली.
नूतन अध्यक्ष उमेर सय्यद यांच्या अधिपत्याखाली नवीन कार्यकारिणी करण्याचा निर्णय झाल्यानंतर असोसिएशनच्या उपाध्यक्ष-कुणाल जायकर (टीव्ही-9), सहसचिव - रोहित वाळके (आजतक), खजिनदार - निखिल चौकर (एबीपी माझा) तर सल्लागार - साहेबराव काकणे (आयबीएन),  सचिन अग्रवाल (साम टीव्ही), सुशिल थोरात (जय महाराष्ट्र).  सदस्य - सचिन शिंदे (महानगर न्यूज), अमिर सय्यद (एटीव्ही), सौरभ गायकवाड (न्यूज 24 सह्याद्री), निलेश आगरकर (न्यू टुडू 24) अशी निवड करण्यात आली.
यावेळी बोलतांना नूतन अध्यक्ष उमेर सय्यद यांनी नूतन कार्यकारिणीमध्ये माझी एकमताने निवड केली, त्याबद्दल असोसिएशनचे आभारी असून, असोसिएशनच्या माध्यमातून नवीन काळात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच असोसिएशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपणसर्वजण कटीबद्ध राहू, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त करुन लवकरच कार्यकारिणीच्या बैठकीत पुढील रुपरेषा ठरविण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले
चौकट
टीव्ही-9 वृत्तवाहिनीचे पुणे येथील वरिष्ठ प्रतिनिधी कै.पांडूरंग रायकर यांचे नुकतेच निधन झाले. रायकर यांनी पुण्याच्या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये वृत्तवाहिनीचे काम गेले 7 ते 8 वर्षे केले होते. कै.रायकर यांच्या निधनानंतर असोसिएशनच्यावतीने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांच्यावतीने वाहण्यात आली. रायकर यांच्या संदर्भातील अनेक आठवणींचा उजाळा अनेकांनी आपल्या श्रद्धांजलीच्या भाषणातून व्यक्त केला.

No comments:

Post a Comment