नेवासा शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू ; तालुक्यातील मृतांची संख्या 19
नेवासा शहरातील आणखी एका 50 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज 4 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळते. सदरची व्यक्ती काही दिवसापूर्वी कोरोना बाधित निघाली होती.
या व्यक्तीला त्रास होत असल्याने सुरुवातीला तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर जास्त त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र आज शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान या व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती नातेवाईक कडून मिळाली.
तर आज पर्यंत तालुक्यातील एकोणावीस जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढत चालला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment