नेवासा फाटा ७ दिवसांकरिता बंद. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, August 7, 2020

नेवासा फाटा ७ दिवसांकरिता बंद. | C24TAAS |

नेवासा शहरानंतर आता नेवासा फाटा देखील ७ दिवसांकरिता बंद ; व्यापाऱ्यांनी मुकिंदपूर ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय.

नेवासा शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नेवासा शहर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. त्याच पाठोपाठ नेवासा फाटा देखील बंद ठेवण्याचा निर्णय नेवासा फाटा येथील व्यापाऱ्यांनी मुकिंदपूर ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज शनिवार ७ ऑगस्ट सायंकाळी झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे.

यावेळी बैठकीस नेवासा फाटा येथील व्यापारी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर ग्रामपंचायतचे सरपंच दादासाहेब निपुंगे यांनी सोशल मीडियावर मेसेज शेअर केला आहे.

 त्यामध्ये म्हटले आहे की मुकिंदपूर हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांना कळविण्यात येते की कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुकिंदपूर व नेवासा फाटा हे उद्या शनिवार ८ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजल्यापासुन १५ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे तरी नागरीकानीं आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे.
बंद मध्ये फक्त दवाखाना व मेडिकल हेच चालु राहतील बाकी सर्व बंद असतील.
नियमांचे पालन नाही केल्यास आपल्याला ५ हजार रुपये दंड करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
परिसरामधील छोटे मोठे गल्लीतले सर्व किराणा दुकान सुद्धा बंद असतील.
आपलीच ग्रामपंचायत
मुकिंदपूर ग्रामपंचायत
घरी राहा सुरक्षित राहा
याप्रमाणे मेसेज सोशल मीडियावर शेअर करून व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे.

शंकर नाबदे नेवासा.मो.9960313029

No comments:

Post a Comment