माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन, दोन दिवसांपूर्वीच झाले होते कोरोनामुक्त - C24Taas - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, August 4, 2020

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन, दोन दिवसांपूर्वीच झाले होते कोरोनामुक्त - C24Taas

माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतपुणे प्रतिनिधी :माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. पहाटे 2.15 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते पुण्यात होते. आज सकाळी त्यांचे शव पुण्याहून निलंग्याकडे रवाना होणार आहे. आज दुपारी अंत्ययात्रा निघणार असून आजच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

दोन दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करुन ते घरी परतले होते. परंतु, पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे पहाटे उपचार सुरु असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. लातूरच्या माजी खासदार रुपाताई निलंगेकर या त्यांच्या सूनबाई, तर राज्याचे माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत. बुधवारी दुपारी निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शिवाजीराव निलंगेकर पाटील हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. 1985-86 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. तर 1990-91 या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.

No comments:

Post a Comment