नेवासा शहर ८ दिवस लॉक डाऊन ; बैठकीत निर्णय. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, August 6, 2020

नेवासा शहर ८ दिवस लॉक डाऊन ; बैठकीत निर्णय. | C24Taas |

अखेर शनिवार ८ ऑगस्ट सायंकाळ पासून नेवासा शहरात ८ दिवसांचा जनता कर्फु.
नेवासा : शहरातील कोरोना रुग्णाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जनता कर्फु करण्यासंदर्भात नगरसेवक,व्यापारी व नागरिकांच्या झालेल्या बैठकीत शनिवार ८ ऑगस्ट सायंकाळपासून ८ दिवसांचा शहरात जनता कर्फुचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
शहरात सुरू असलेल्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर पुन्हा जनता कर्फु करण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन काही नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे केले होते.त्यानंतर एक बैठक ही घेण्यात आली होती मात्र यात मध्ये दोन मत प्रवाह निर्माण झाले होते.दरम्यान मागील दोन-तीन दिवसात रुग्ण वाढत असल्याने जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यासाठी गुरुवारी नगरपंचायत प्रांगणात व्यावसायिक,नागरीक,राजकीय पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये जनता कर्फ्यु करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,सतीश पिंपळे,संजय सुखदान,नितीन दिनकर,अशोक गुगळे,विजय गांधी,नगरसेवक रणजित सोनवणे,दिनेश व्यवहारे,जितेंद्र कुर्हे, दिनेश व्यवहारे,विजय गांधी,जकीर शेख,नितीन जगताप,इम्रान दारुवाले,सतीश गायके, निरंजन डहाळे यांच्यासह व्यवसायिक, नागरिक उपस्थित होते.

शहरात अत्यावश्यक सेवेतील हॉस्पिटल व मेडिकल राहणार सुरू.बाकी व्यवहार राहणार बंद..


WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment