राम मंदिर भूमीपूजनाचा घोडेगावात आनंदोत्सव साजरा. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, August 5, 2020

राम मंदिर भूमीपूजनाचा घोडेगावात आनंदोत्सव साजरा. | C24Taas |

राम मंदिर भूमीपूजनाचा घोडेगावात आनंदोत्सव साजरा .
नेवासा - 500 वर्षा पासून प्रलंबित असलेल्या आयोध्या श्री राम मंदिराचे भुमीपूजन आज बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले ,आयोध्या येथे मंदिराचा भूमीपुजन सोहळा झाल्याचा आनंदोत्सव घोडेगाव येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला .
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी सोहळ्याच्या दरम्यान श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील भगवान श्रीरामाची विधिवत पूजा अभिषेक आरती करण्यात आली ,यावेळी एकमेकांना पेढे भरवत मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला ,गावातील भजनी मंडळींनी टाळकरी यांनी मंदिरात भजन व श्रीराम नामाचा जप केला ,जय श्री राम च्या घोषणा देण्यात आल्या ,गावात अनेक घरांवर भगवा झेंडा उभारण्यात आला .
यावेळी बोलताना सचिन देसरडा म्हणाले की श्री राम मंदिर हे आपल्या धर्माचा आस्थेचा विषय आहे ,तब्बल 500 वर्षा नंतर हा प्रश्न मार्गी लागून आज मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले ,आपल्या सर्वांच्या आयुष्यातील  हा एक भाग्याचा क्षण आहे ,आपल्या तालुक्यातून देवगड संस्थान चे मठाधिपती गुरुवर्य प पु भास्करगिरी महाराज हे अयोध्येत राममंदिराच्या भूमीपूजनासाठी विशेष आमंत्रित आहेत ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे .
या वेळी ह.भ.प.कोरडे महाराज, बोरूडे महाराज, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा , उपसरपंच संदीप येळवंडे , पंकज लांभाते ,पारस चोरडिया
रवींद्र सोनवणे,सचिन चोरडिया ,अरुणकाका जाधव ,दिलीप काळे ,पंकज लांभाते ,मनोज बोरुडे ,भाजपा जिल्हा सरचिटनिस ऍड.स्वप्नील सोनवणे ,शरद सोनवणे , येळवंडे मेजर,मच्छिंद्र कदम,गणेश पाचे ,संतोष कुवाड,दादा शिंदे ,संतोष लोंढे ,अशोक टेमकर,निसार सय्यद ,अली शेख ,राजेंद्र येळवंडे ,शिवाजी ईखे ,मुन्ना गारूळे..तसेच गांवातील भजनी मंडळ,आदी उपस्थित होते.

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment