नेवासा - माजी प्राचार्यांच्या घरावर दरोडा; १ महिला जखमी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, August 22, 2020

नेवासा - माजी प्राचार्यांच्या घरावर दरोडा; १ महिला जखमी. | C24Taas |

नेवासा - माजी प्राचार्यांच्या घरावर दरोडा; १ महिला जखमी. | C24Taas |
नेवासा - नेवासा फाटा परिसरात मुख्य रस्त्यावरील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या घरावर शुक्रवारी मध्यरात्री दरोडा पडला आहे.
ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर मुख्य रस्त्या लगत माजी प्राचार्य श्री.आगळे यांचा बंगला आहे.शुक्रवारी मध्यरात्री दोन चे सुमारास हा दरोडा पडला.दरोडेखोरांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाच्या हातात लाकडी दांडके तर दुस-याच्या हातात काहीतरी धारदार हत्यार होते.
त्यातील एकाने श्री व सौ. आगळे  यांना गप्प बसा अन्यथा तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. सौ. आगळे यांच्या गळ्यातील गंठण तोडून घेतले. तर दुसºयाने हातातील सोन्याची बांगडी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगडी निघाली नाही. त्यामुळे त्याने हातात असलेल्या धारदार शस्त्राने ती बांगडी कापली. त्यावेळी सौ.आगळे यांच्या हाताला जखम झाली. त्यावेळी आगळे यांनी आरडाओरडा केल्याने बाहेर उभा असलेल्या चोरट्यांच्या साथीदाराने लवकर आवरा कोणीतरी येत आहे असे सांगितले. त्यावेळी हातातील कापलेली बांगडी खाली पडली. ती तशीच सोडून चारही चोरटे घराबाहेर पळून गेले.
यामध्ये चोरट्यांनी १ लाख ४० हजार किंमतीचे सात तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले आहे. तर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे,पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचे सह पोलीस पथकाने घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.श्वान पथक व ठसे तज्ञ ही घटनास्थळी दाखल झाले होते.याबाबत आगळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment