बीड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लॉकडाऊनच्या विरोधात डफली बजाव आंदोलन.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक
बीड (प्रतिनिधी)
गौतम औसरमल
कृष्णा नन्नवरे
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या लाॅकडाऊन तोडून संपूर्ण महाराष्ट्र बीड जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले आज बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले यामध्ये बीड, परळी ,गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, वडवणी, धारूर मात्र शिरूर(का) तालुक्यात आंदोलन झाले नाही.या ठिकाणी आंदोलन करण्यात आले, आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष जोगदंड, ज्ञानेश्वर कवठेकर, अजय सरोदे, शेख युनूस, संदीप जाधव, अनिकेत डोळसे, राजू कवठेकर, अभिजीत डोंगरे, अजय साबळे साबळे, किरण वाघमारे उमेश साळवे,सुमेध उजगरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनामध्ये सार्वजनिक वाहतूक आणि बससेवा बंद करण्यात आल्या त्या चालू करा जिल्ह्यात अंतर्गत बस सेवा चालू न करता जिल्ह्याच्या बाहेर बस सेवा चालू करा, ऑफिस दुकाने हॉटेल मार्केट यामुळे लोकांच्या आपापसातील संपर्क कमी होईल अशा प्रकारचे सर्व व्यवहार निर्बंधित घालण्यात आले, आहेत ते चालू करा या चार महिन्यात कोरोना रोगाचा प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनारणाच्या प्रसार पॅटर्न लक्षात घेऊन कोरणा प्रतिबंधात्मक उपाययोजना मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे गरीब व हातावर पोट असणाऱ्या बहुसंख्य लोकांचा रोजगार एकूण उद्योग व्यवसाय आणि अर्थव्यवस्था व वर तात्काळ सुरू करण्यास ची आवश्यकता आहे कोरोना विरुद्ध लढायची प्रतिकारक्षमता 80% लोकांनी दाखवली आहे 15% लोक औषधोपचाराला प्रतिसाद देऊन बरे होत आहेत 5 % लोक फक्त यामुळे बाधित आहेत अद्ययावत वैद्यकीय उपचार घेऊन ही नियंत्रणात आणता येत नाही वैद्यकीय दृष्ट्या गंभीर होत आहे व त्याला बळी पडत आहेत सरकारने पाच टक्के लोकांच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरणा नियंत्रणाचे सूत्र ठरले पाहिजे शंभर टक्के लोकांवर निर्बंध घालण्याची दुष्परिणाम समोर आले आहेत अर्थव्यवस्था संकटात आहे 80 टक्के पेक्षा जास्त अधिक लोकांना बेरोजगारी आणि उपासमारीचा सामना करावा लागत आहे या गेल्या चार महिन्यात आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जात आहे यासाठी आज संपूर्ण राज्यभर त्यामध्ये बीडसह आंदोलन करण्यात आले.
No comments:
Post a Comment