नेवासा तालुक्यात ४२ नवीन रुग्ण आढळले.तर ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, एकूण रुग्ण संख्या ४३५ वर देवसडे, नेवासा शहर,भानसहिवरा,देवगाव, सोनई, भेंडा बुद्रुक, जळके,नागापूर,कुकाणा येथील कोरोना बाधीत रुग्णाचा समावेश
नेवासा तालुक्यात १३ ऑगस्ट गुरुवारी नव्याने ४२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असल्याचे माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली.तालुक्यातील रुग्णासंख्या चारशेचा आकडा पार करत ४३५ इतकी झाली आहे.तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्या ३०१ इतकी आहे.
नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी घेण्यात आलेले स्त्राव अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.गुरूवारी आलेल्या अहवालात ११ व्यक्ती कोरोना बाधीत आढळेल असून त्यामध्ये नेवासा शहर पाच,भानसहिवरा तीन तर नागापूर,कुकाणा व देवगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
गुरुवारी खाजगी रुग्णालयातुन आलेल्या अहवालात नऊ कोरोना बाधीत आढळेल असून यामध्ये सोनई येथील चार,नेवासा शहर तीन,देवसडे व भानसहिवरा येथिल प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
गुरुवारी कोविड केअर सेंटर येथे १०५ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये २२ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले असून यात सोनई येथील आठ,नेवासा शहर आठ,भेंडा बुद्रुक येथील तीन,तर भानसहिवरा,खडका व कुकाणा येथील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले तर ८३ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ४३५ वर गेली आहे.१७ व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने ३०१ कोरोनामुक्त झाले आहे.
https://chat.whatsapp.com/IaPMmCxCmVk1J7SZxj4KuV
नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी घेण्यात आलेले स्त्राव अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.गुरूवारी आलेल्या अहवालात ११ व्यक्ती कोरोना बाधीत आढळेल असून त्यामध्ये नेवासा शहर पाच,भानसहिवरा तीन तर नागापूर,कुकाणा व देवगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
गुरुवारी खाजगी रुग्णालयातुन आलेल्या अहवालात नऊ कोरोना बाधीत आढळेल असून यामध्ये सोनई येथील चार,नेवासा शहर तीन,देवसडे व भानसहिवरा येथिल प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
WhatsApp Group 👇
https://chat.whatsapp.com/IaPMmCxCmVk1J7SZxj4KuV
शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment