नेवासा शहरातील एका कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू ; तालुक्‍यात दोन रुग्णांची वाढ. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, August 11, 2020

नेवासा शहरातील एका कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू ; तालुक्‍यात दोन रुग्णांची वाढ. | C24Taas |

नेवासा शहरातील एका कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू तर तालुक्यात आज पर्यंत नऊ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू.
नेवासा शहरातील आणखी एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याबाबत अहवाल जिल्हा रुग्णालयातुन प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.| C24Taas |
 तालुक्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून ११ ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील नऊ कोरोना बाधितांना आपला प्राण गमवावा लागला आहे.यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह,माळी चिंचोरा व खेडलेकाजळी, घोडेगाव,सोनई,कांगोणी,प्रवरासंगम (माळेवाडी),येथील प्रत्येकी एकाचा तर नेवासा शहरातील दोघांचा आज पर्यंत समावेश आहे.दरम्यान तालुक्यातील मृतांची संख्या नऊ वर गेली आहे. | C24Taas |
मंगळवारी खाजगी रुग्णालयातुन घोडेगाव येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दिवसभरात तालुक्यात दोन कोरोना बाधितांची वाढ झाली असून रुग्ण संख्या ३७२ इतकी झाली आहे.मंगळवारी १९ जणांना डिस्चार्ज दिल्याने २६७ व्यक्ती कोरोनामुक्त मुक्त झाले आहे.तर ९६ व्यक्ती उपचार घेत आहे.| C24Taas |

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment