संगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, August 23, 2020

संगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता

 संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून

एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता


संगमनेर : शाविद शेख


संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या पाण्यातून दुचाकीवरून दोन जण जात असताना दुचाकी सह दोघेही वाहून गेले असून यात एक जण सापडला आहे. तर दुसरा बेपत्ता झाला असल्याची घटना रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजे दरम्यान घडली आहे. शरद धोंडीबा कोल्हे (वय - ३३, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे बेपत्ता झाल्याचे नाव आहे. 

गेल्या बारा तासा पासून पुलावरून पाणी जात आहे. मात्र याठिकाणी एक ही पोलिस किंवा प्रशासनचा एक पण कर्मचारी त्या ठिकाणी नसल्याने ही घटना घडली आहे. प्रशासन आता कोरॉनाच्या नावाखाली आपले इतर कामे झटकातांना दिसत आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, सुनील चांगदेव आहेर

 (वय - २७) व शरद धोंडीबा कोल्हे (दोघे राहणार कोल्हेवाडी) हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच १७ ए एस ६७२८ हिच्या वरून रविवारी दुपारी एक वाजे दरम्यान प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून जात होते. यावेळी या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्या पाण्यातून त्यांनी दुचाकी घातली असता दुचाकीचे चाक पाण्याच्या प्रेशर मुळे घसरले आणि दोघेही वाहून गेले. यामधील सुनील आहेर हा मोठ्या पुलाच्या खाली सापडला आहे. तर शरद कोल्हे हा तरुण बेपत्ता झाला असून त्याचा शोध त्याचे नातेवाईक व ग्रामस्थ घेत आहेत. दरम्यान प्रवरा नदी व म्हाळुंगी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून धांदर फळ येथील पुला सह सर्व छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत.धांदर फळ या पाण्यावरून नागरिक दुचाकी घेवून जात असून आपला जीव धोक्यात घालत आहे. यामध्ये दुचाकीला वाचवताना चार जण बालंबाल बचावले आहेत. या लोकांवर प्रशासनाचे अजिबात लक्ष नसून तहसीलदार अमोल निकम साहेब आपले लक्ष तरी कुठे आहे, की कोरोनच्या नावाखाली सर्वच झाकून ठेवत आहे का? कोरोणा कडे लक्ष देता देता लोक पाण्या मध्ये वाहून जात आहेत त्यामुळे तिथेही लक्ष द्या. सदरची घटना मोठी असून प्रशासनाने याचे गांभीर्य त्वरित ओळखून लवकरात लवकर उपाय योजना करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment