कोरोना काळातही बीडच्या 'लाइनवुमन' सुट्टी न घेता करतात काम, पंचक्रोशीत कौतुक. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, August 11, 2020

कोरोना काळातही बीडच्या 'लाइनवुमन' सुट्टी न घेता करतात काम, पंचक्रोशीत कौतुक.

कोरोना काळातही बीडच्या 'लाइनवुमन' सुट्टी न घेता करतात काम, पंचक्रोशीत कौतुक.


बीड (प्रतिनिधी)
औसरमल गौतम
नन्नवरे कृष्णा

उषा जगदाळे यांचा जिल्ह्यातील आष्टी येथे शेतकरी कुटुंबात जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम. शालेय शिक्षण घेत असताना राष्ट्रीय पातळीवर खो-खो या खेळामध्ये अकरा वेळा सुवर्णपदक त्यांनी पटकावले. त्यांचे खेळातील योगदान लक्षात घेता त्यांना महाराष्ट्र टीमचे कर्णधार पदही दिले होते. घरच्या परिस्थितीमुळे उषा यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही.
'लोक काय म्हणतील' याचा विचार करण्यापेक्षा मनात जिद्द व आपण करत असलेल्या कामावर श्रद्धा असली की, कुठल्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवता येतो. याचा प्रत्यय बीडच्या उषा भाऊसाहेब जगदाळे यांच्या कार्यातून येतो. महावितरण विभागात लाईनवुमन म्हणून काम करणाऱ्या उषा जगदाळे या कोरोनासारख्या महामारीच्या बिकट परिस्थितीतदेखील एकही दिवस सुट्टी न घेता काम करतात. विशेष म्हणजे विद्युत खांबावर चढून काम काम करण्याला त्या प्राधान्य देत आहेत.
कोरोना काळातही बीडच्या 'लाइनवुमन' सुट्टी न घेता करतात काम, पंचक्रोशीत कौतुकउषा जगदाळे यांचा जिल्ह्यातील आष्टी येथे शेतकरी कुटुंबात जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम. शालेय शिक्षण घेत असताना राष्ट्रीय पातळीवर खो-खो या खेळामध्ये अकरा वेळा सुवर्णपदक त्यांनी पटकावले. त्यांचे खेळातील योगदान लक्षात घेता त्यांना महाराष्ट्र टीमचे कर्णधार पदही दिले होते. घरच्या परिस्थितीमुळे उषा यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही. विवाहानंतरही उषाने जिद्द सोडली नाही. पतीच्या खांद्याला खांदा लावत पतीला दुग्धव्यवसायात मदत केली. खेळाच्या मेरीटवर २०१३ साली महावितरणची जाहीरात निघाली आणि खेळाडू कोट्यातून महावितरणमध्ये 'तंत्रज्ञ' म्हणून त्यांची निवड झाली. महावितरणच्या उपविभाग कार्यालयात काम करताना कार्यालयीन कामकाज न करता हे क्षेत्र महिलांसाठी केवळ कार्यालयीन न राहता प्रत्यक्षात खांबावर चढून काम करण्यास प्राधान्य दिले. या मागची एवढीच भूमिका की महिला कुठेही कमी नाहीत. उषा या स्वतः विजेची तार असलेल्या खांबावर चढून दुरूस्तीचे काम वेळेत करतात. मागील चार पाच महिन्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या व लॉकडाऊन काळामध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवत ग्राहक तक्रार निवारण केंद्राची कामेही त्यांनी अखंडीतपणे केली आहेत. 
घरची जबाबदारीही चोखपणे सांभाळतात -उषा जगदाळे यांना दोन जुळी मुले आहेत. तसेच कुटुंबात पतीसह सासू-सासरे आहेत. उषा यांनी कुटुंबातील सर्वांची जबाबदारी अत्यंत चोखपणे सांभाळली आहे. उषा जगदाळे यांचे हे काम इतर महिलांना प्रेरणा देणारे आहे. संपूर्ण महाराष्ट्र उषा जगदाळे यांच्या या प्रेरणादायी कर्तुत्वाला सलाम करतोय.

No comments:

Post a Comment