नेवासा - अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, August 28, 2020

नेवासा - अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले.

नेवासा - ई- निविदा प्रक्रिया व बी-1 निविदा प्रक्रिया राबवताना होणाऱ्या मानवी हस्तक्षेपा बाबत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नेवासा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर विविध विकास कामांचा निधी खर्च करतांनी शासनाने ठरवून दिलेल्या ई- निविदा प्रक्रिया व बी-1 निविदा प्रक्रिया राबवताना होणाऱ्या मानवी हस्तक्षेपा बाबत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की नेवासा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर विविध विकास कामांचा निधी खर्च करतांनी शासनाने ठरवून दिलेल्या नामांकनाप्रमाणे ई- निविदा प्रक्रिया तसेच बी-1 निविदा प्रक्रिया होत नाही. यामध्ये मानवी हस्तक्षेपामध्ये पाहिजे त्या ठेकेदारास निविदा कशी मिळेल यासाठी काही जाचक अटी लागल्या जातात. त्यामध्ये ईपीएफची अट टाकणे तसेच ई- निविदा प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून प्रसिद्ध न होता खाजगी व्यक्तीकडे सरपंच, ग्रामसेवक यांची की देऊन ह्या प्रक्रिया राबवल्या जातात. तसा प्रशासनाचा नियम नाही. तरीसुद्धा नियमबाहय पद्धतीने या निविदा प्रक्रिया राबवल्या जातात. यासाठी ज्या ग्रामपंचायतीकडे संगणक परिचालक नाही किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत त्यासाठी पंचायत समिती कार्यालयात निविदा कक्षा असायला पाहिजे तो आपल्याकडे नाही. तसेच बी-1 निविदा प्रक्रिया राबवितांनी जास्त खपाच्या दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानी स्थानिक साप्ताहिक मध्ये जाहिरात देऊन ही प्रक्रिया मनमानी पद्धतीने मिळून मिसळून राबवली जाते. यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या कामाचा 33:33:34 टक्के रेषे होत नाही.( मजूर सोसा/ सुबे/ ओपन) या सर्व प्रक्रियेत आपण स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पठारे, तालुका अध्यक्ष राहुल चिंधे,अक्षय झिने, महेश चव्हाण, पांडुरंग औताडे, हेमंत शेरकर, ज्ञानेश्वर भाकरे, रमेश लासे यांच्या निवेदनावर सह्या आहे.

No comments:

Post a Comment