नेवासा शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू ; तालुक्यातील मृतांची संख्या १० - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, August 14, 2020

नेवासा शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू ; तालुक्यातील मृतांची संख्या १०

नेवासा शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू ; शहरात मृतांची संख्या ३ तर तालुक्यातील मृतांची संख्या १०
नेवासा शहरातील आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली..आत्तापर्यंत तालुक्यातील दहा कोरोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे
तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला नेवासा शहरात कोरोना बाधितांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. मागील काही दिवसातच शहरात कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर गेला आहे.
शुक्रवारी तालुका प्रशासनाला मिळालेल्या अहवालात शहरातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.शहरात मागील २० दिवसात शहरात तिघांनी आपला प्राण गमावला आहे.
तालूक्यात शुक्रवारी रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये २६ व खाजगी रुग्णालय अहवालात एक असे २७ रुग्णांची वाढ झालेली आहे.तालुक्यातील रुग्ण संख्या ४६२ वर गेली आहे.१३ व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने ३१४ कोरोनामुक्त झाले आहे.

No comments:

Post a Comment