कासर पिंपळगाव ता.पाथर्डी येथे गावठी कट्टा व तलवार विक्री करण्यासाठी आलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी जेरबंद केले आहे.२४/०८/२०२० रोजी श्री . दिलीप पवार , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि , कासार पिंपळगाव ता.पाथर्डी येथे वृध्देश्वर सहकारी कारखाना परीसरामध्ये दोन इसम हे त्यांच्या जवळील विनानंबरचे मोटारसायकल वरुन गोणीमध्ये दोन तलवार व गावटी कटटा घेवुन विक्रीसाठी येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन कायदेशीर कारवाई करणेकामी श्री . शिशिरकुमार देशमुख , पोहेकॉ मनोहर गोसावी , पोना / राम माळी , पोना / सचिन आडबल , पोकॉ / राहुल सोळंके , पोना / रविकिरण सोनटक्के , पोना / दिपक शिंदे , पोना / ज्ञानेश्वर शिंदे व पोकॉ / रणजीत जाधव सर्व नेमणुक स्थानिक गुहे शाखा अ.नगर यांचे पथक तयार केले . वरील पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वृध्देश्वर सहकारी कारखाना येथे जावुन सापळा लावुन थांबले असता दोन इसम हे वृध्देश्वर कारखान्याकडे मोटारसायकलवरुन येवुन थांबले त्यातील पाटीमागे बसलेला इसम हा मोटारसायकलवरुन खाली उतरला त्यावेळी त्याचे जवळ एक गोणी होती . पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची चाहुल लागताच मोटार सायकल चालवणारा इसम त्याचे जवळील पल्सर मोटारसायकल चालु करुन वेगाने पळुन गेला व त्याठिकाणी उभा असलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अकाश अण्णा फुलारी , वय- २२ वर्षे , रा . कासार पिंपळगाव ता.पाथर्डी जि.अ.नगर सांगीतले . तसेच त्यास पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव २ ) किरण नामदेव फुलारी रा.कासार पिंपळगाव ता.पाथर्डी जि.अ.नगर असे असल्याचे सांगीतले त्याचे अंगझडती मध्ये ( १ ) एक देशी बनावटीचे पिस्टल ( २ ) जिवंत काडतूस ( ३ ) २ तलवारी ( ४ ) एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकुण ४१,२०० / -रु . किमतीचे मुद्देमालासह मिळुन आल्याने तो पंचासमक्ष पंचनामा करुन ताठ्यात घेतला आहे . सदर बाबत पाथर्डी पो . स्टेला भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५,४ / २५.७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई पाथर्डी पो.स्टे . हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.अखिलेश कुमार सिंह साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री.सागर पाटील सो . , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . मंदार जावळे साहेब , उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे
प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर C24 Taas
मो.8956376269
No comments:
Post a Comment