गेवराईत वंचित बहुजन आघाडी कडुन डफली बजाव आंदोलन:-सय्यद सुभानभाई
बीड (प्रतिनिधी)
गौतम औसरमल
कृष्णा नन्नवरे
सार्वजनिक वाहतूक सेवा या प्रमुख मागणी सह छोठे मोठे व्यवसाय सुरु झाले पाहिजेत या मागण्या घेऊन देशाचे स्वाभिमानी नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व राज्य महासचिव भिमराव आबा दळे व कृतिशील जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रा.शिवराज बांगर सर यांच्या सूचनेवरून मा.तालुकाध्यक्ष सय्यद सुभान मा.युवकध्यक्ष बंट्टी सौंदरमल तालुका महासचिव किशोर भोले यांच्या नेतृत्वाखाली गेवराईमध्ये डफली बजाव आदोंलन यशस्वी करण्यात आले गेली २५मार्च पासुन कोरोना रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या परंतु यामध्ये केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे.लाॅकडाऊनमुळे लोकांचा आप-आपसातील संपर्क कमी झाला असून छोटी मोठी व्यवसाय बंद करुन हातावर पोट असलेल्या वंचित घटकावर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या चार महिन्यांपासून वाहतुक सेवा बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांसह सर्व सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे.या सर्व जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व राज्य महासचिव भिमराव आबा दळे जिल्हाध्यक्ष प्रा. बांगर सर यांच्या सूचनेवरून गेवराई येथे डफली बजाव आंदोलन मोठ्या संख्येने संपन्न झाले यावेळी या डफली बचाव आंदोलनामध्ये सय्यद सुभानभाई बंटी सौंदरमल किशोर भोले,कैलास भोले,रंजित शिंदे,सुधाकर केदार,प्रमोद निकाळजे,पप्पु वाव्हळ, विलास वावधने,अनंत वाव्हळ, वरिष्ठ आबुज,भैय्यासाहेब वाव्हळ,महेश माटे, राउत सर,कांता गायके,अजय वाव्हळ,अकाश निकाळजे,किशोर चव्हाण,बाळु पटेल,लक्षमण पवार, बाळु आडागळे,विकास हराळे,डॉ रामहरी नागरे,प्रदिप शिंदे,महेश कांबळे, संदिप हराळे, शेख बाबा बबु पठाण सय्यद आसेफ सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment