नेवासा - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा अधिकृत शिवसेनात प्रवेश. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, August 11, 2020

नेवासा - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा अधिकृत शिवसेनात प्रवेश. | C24TAAS |

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनात प्रवेश
नेवासा - राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज अधिकृत रित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री गडाख यांना शिवबंधन बांधले.
श्री.गडाख हे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर क्रांतिकारी पक्षाचे बॅट या चिन्हावर अपक्ष निवडुन आले होते. शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षाने एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली त्यावेळी अपक्ष आमदार म्हणून शंकरराव गडाख यांनी सर्वप्रथम शिवसेनेलाच पाठींबा दिला होता.
नंतर झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणात श्री गडाख हे सेने बरोबरच राहिले होते.त्याचे फलित म्हणून त्यांची सेनेच्या कोठ्यातून मृद व जलसंधारण विभागचे कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली होती.
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधनाने नगर जिल्ह्यातील शिवसेनेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती.आता ना. गडाख यांनी अधिकृत पणे सेनेत प्रवेश केल्याने नगर जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे बळ मिळणार आहे.


WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment