बीड- रायमोह येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रायामोह गाव कँटोन्मेंट झोन घोषित. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, August 10, 2020

बीड- रायमोह येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रायामोह गाव कँटोन्मेंट झोन घोषित.

रायमोह येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रायामोह गाव कँटोन्मेंट झोन घोषित.


बीड (प्रतिनिधि ) कृष्णा नन्नवरे सह गौतम औसरमल- रायमोहा येथे कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे रायमोह गाव कँटोन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून पूर्ण गाव बंद करण्यात आले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून (14 दिवस) 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण व्यवहार बंद राहतील घराबाहेर कुणीही पडू नका अशा सूचना शिरूर चे तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी दिल्या आहेत.
 याबाबत अधिक माहिती अशी की रायमोह येथील रुग्ण वय 60 वर्ष हे गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी होते काही दिवस रायमोह येथे उपचार घेऊन ते पुढील उपचारासाठी बीड येथे गेले असता बीड वरून  यांना औरंगाबाद येथे पाठवले. बीड येथे असताना त्यांच्या स्वाब चे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. काल औरंगाबाद येथे पुन्हा  स्वब घेतल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रायमोह गावात खळबळ उडाली आहे . रुग्ण यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची स्वाब तपासनीसाठी पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे रायमोह गाव  कँटोन्मेंट झोन घोषित केल्यामुळे गाव कडेकोट बंद ठेवण्यात आले आहे. तलाठी श्री खाडे, ग्रामसेवक श्री जायभाय ,ग्रामपंचायत सर्व कर्मचारी ,जमादार श्री गर्जे साहेब ,माने साहेब हे  गावातील  परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

No comments:

Post a Comment