नेवासा - माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सह इतर आंदोलकांवर गुन्हे दाखल. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, August 1, 2020

नेवासा - माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सह इतर आंदोलकांवर गुन्हे दाखल. | C24Taas |

नेवाशात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत दूध दरवाढीसाठी रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,माजी आमदार मुरकुटे,तालुकाध्यक्ष दिनकर,शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्यासह ३० ते ३५ आंदोलकांवर गुन्हे दाखल.
नेवासा तालुका भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी शनिवारी शहरात रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान जिल्हाधिकारी यांचे कडील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्यासह ३० ते ३५ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.पो.कॉ. प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात.
तसीलदार यांनी भाजप तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांना कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रस्तारोको मध्ये सदर आजाराची इतरांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपआपसांत सुरक्षित अंतर राहावे म्हणून गर्दी,यात्रा मेळावे व इतर यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ सबब उपरोक्त बाबी लक्षात घेता दि.१ ऑगस्ट रोजीच्या रस्तारोकोला परवानगी नाकारण्यात येत आली असल्याने रस्तारोको पुढे ढकलण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा असा आदेश दिला होता.त्याप्रमाणे नोटीस ही बजावली होती. मात्र तरीही भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष गोंदकर,माजी आमदार मुरकुटे,तालुकाध्यक्ष नितीन दिनकर,शहराध्यक्ष मनोज पारखे,ज्ञानेश्वर पेचे,राजेश कडू,ज्ञानेश्वर टेकाळे,निरंजन डहाळे,रामचंद्र खंडाळे,विवेक ननवरे,संदीप आलवणे यांच्यासह तीस ते पस्तीस आंदोलकांनी
जहिरात.
 नेवासा पंचायत समिती समोर रोड अडवून भाषणे करून जिल्हाधिकारी यांचे कडील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून सोशल डीस्टन्सीचे पालन न करता तसेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८८७ च्या अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी जिविताला व आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका पोहचेल असे कृत्य केले.या फिर्यादीवरून वरील आंदोलन कर्त्यांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम 188,269 ,270 व मुंबई पोलीस अधिनियम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे तसेच महाराष्ट्र कोविड-19 चे उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

जाहिरात.


No comments:

Post a Comment