श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा शहरात 6,तालुक्यात 19 दिवसभरात तालुक्यात 25 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
काहीदिवसात श्रीगोंदा शहरातील कोरोना रुग्ण मिळून येण्याचे प्रमाण शून्य होते
परंतु आज पुन्हा श्रीगोंदा शहरात एकाच दिवसात 6 नवीन व्यक्ती या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत तर तालुक्यात आज 19 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे
दिवसभरात एकूण 25 व्यक्ती या कोरोना पॉझीटिव्ह आल्या आहेत
श्रीगोंदा शहरातील कासार गल्ली 5, काळकाई चौक 1, तर तालुक्यातील
दाणेवाडी 5,आनंदवाडी 1, बेलवंडी 2, म्हातार पिंपरी 2, एरंडोली 3, पारगाव 2,
ढवळगाव, चिखलठण वाडी, जंगलेवाडी, पिंपरी कोलंदर प्रत्येकी एक
असे एकूण 25 नवे रुग्ण आज मिळून आले आहेत
तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या 578 एवढी झाली आहे
तर आत्तापर्यत 490 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 57 जणांवर उपचार सुरू आहेत
तर आत्तापर्यंत तालुक्यातील 16 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे अशी माहिती श्रीगोंदा आरोग्य विभागाने दिली आहे
No comments:
Post a Comment