श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे आणखी 3 मृत्यू तालुक्याचा आकडा 19 वर आज दिवभरात श्रीगोंदा तालुक्यात 14 कोरोना पॉझिटिव्ह श्रीगोंदा शहरात-5
श्रीगोंदा प्रतिनिधी:श्रीगोंदा तालुक्यात मृत्यूचा आकडा वाढत ही चिंतेची बाब आहे आज तालुक्यात 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला त्यामध्ये तालुक्यातील
देवदैठण मध्ये एक 75 वर्षीय पुरुषाचा तर काष्टी येथे 2 पुरुषांचा वय अंदाजे 60,65 वर्ष मृत्यू झाला आहे त्यामुळे तालुक्याचा मृत्यु आकडा 19 वर गेला आहे
आज दिवसभरात श्रीगोंदा शहरात 5,तालुक्यात 9 आसे तालुक्यात 14 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत
शहरात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे कधी कमी तर कधी वाढत आहे
दिवसभरात एकूण 14 व्यक्ती या कोरोना पॉझीटिव्ह आल्या आहेत
श्रीगोंदा शहरातील बालाजी नगर-3,मखरेवाडी-1,गुळवे कॉलेज परिसर 1 तर तालुक्यातील काष्टी -3,मढेवडगाव-2,
मांडवगण, आनंदवाडी,पेडगाव,हंगेवाडी प्रत्येकी 1एक आसे एकूण 14 नवे रुग्ण आज मिळून आले आहेत
तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या 618 एवढी झाली आहे
तर आत्तापर्यत 530 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 48 जणांवर उपचार सुरू आहेत
तर आत्तापर्यंत तालुक्यातील 19 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे अशी माहिती श्रीगोंदा आरोग्य विभागाने दिली आहे
No comments:
Post a Comment