नेवासा - नगरसेवकांसह पोलीसांचे नेवासकरांना काळजी घेण्याचे आवाहन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, July 31, 2020

नेवासा - नगरसेवकांसह पोलीसांचे नेवासकरांना काळजी घेण्याचे आवाहन. | C24Taas |

नेवासा - नगरसेवकांसह पोलीसांचे नेवासकरांना काळजी घेण्याचे आवाहन.
नेवासा शहराची  सध्याची कोरोणा परिस्थिती बघता नेवासा शहरामध्ये काळजी घेण्याची गरज आहे. तसे न झाल्यास नेवासा शहर बंद करण्याची वेळ आपल्यावर ओढवू शकते. त्यामुळे  नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी केले आहे. | C24Taas |
करोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर यंदाची बकरी ईद  साध्या पद्धतीने साजरी करा, कोणीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये,काम असेल तरच बाहेर पडा,  तोंडाला मास्क लावा, व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नेवासा पोलिसांनी केलं आहे.त्याच बरोबर नियमाचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.| C24Taas |
  तर शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन काही नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे केले आहे.मागील चार महिन्यात शहरात अवघे चार रुग्ण आढळून आले होते मात्र आता रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील विविध भागात रुग्ण आढळून येत असून शुक्रवारी शहरातील ५ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आला आहे. | C24Taas |
नेवासा शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली असून शुक्रवारी दुपारनंतर शहरातील अनेक नगरसेवकांनी नेवासा शहरातील नागरिकांना काम असेल तरच बाहेर पडा, तोंडाला मास्क लावा,व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी,नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले अन्यथा नेवासा शहर बंद करण्याची वेळ आपल्यावर ओढवणार असल्याचा इशारा सोशल मिडियाद्वारे केले आहे. | C24Taas |


No comments:

Post a Comment