नेवासा येथील आषाढी वद्य एकादशीला होणारी ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा रद्द. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, July 10, 2020

नेवासा येथील आषाढी वद्य एकादशीला होणारी ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा रद्द. | C24Taas |

नेवासा येथील आषाढी वद्य एकादशीला होणारी ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा रद्द. | C24Taas |

नेवासा- ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील आषाढी वद्य एकादशीला गुरुवारी दि.१६ जुलै रोजी होणारी संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख व देवस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले यांनी दिली.

याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सद्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोविड १९ या विषाणू जन्य रोगाचा फैलाव झाला असून त्याचा प्रादुर्भाव संपुर्ण महाराष्ट्र राज्यात व नगर जिल्ह्यात देखील सुरू आहे.श्री क्षेत्र नेवासा हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान व माऊलींची कर्मभूमी असल्याने नेवासेनगरीत पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी शुद्ध एकादशीनंतर येणाऱ्या आषाढी वद्य एकादशीला मोठी यात्रा भरत असते कारण माऊलींचे दर्शन घेतल्यावरच आषाढी पायी वारीची पूर्णता होते असे वारकरी संप्रदायात मानले जात असल्याने येथे आषाढी वद्य कामीका एकादशीला मोठी यात्रा भरत असते या दिवशी लाखोंच्या संख्येने माऊलींच्या पैस खांबाच्या दर्शनासाठी येथे भाविक येत असतात.मात्र या एकादशीच्या संबंधाने कोरोना रोगाच्या फैलावामुळे मानवीय जीवितास धोका असल्यामुळे या वद्य एकादशीला गुरुवारी दि.१६ जुलै रोजी होणारा यात्रा उत्सव शासकीय आदेशाचे पालन म्हणून रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळींनी एकमताने घेतला असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

नेवासा तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा. 👇
https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share

गुरुवार दि.१६ जुलै रोजी आषाढी वद्य कामीका एकादशीचा यात्रा उत्सव रद्द झाल्याने कोणीही श्रध्दापोटी या स्थानावर दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करु नये,घरीच बसून माऊलीचे ध्यान करावे असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख व संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment