सोनई १४ दिवसासाठी हॉट स्पॉट जाहीर; नामदार गडाखांनी केली पाहणी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, July 10, 2020

सोनई १४ दिवसासाठी हॉट स्पॉट जाहीर; नामदार गडाखांनी केली पाहणी. | C24Taas |

सोनई १४ दिवसासाठी हॉट स्पॉट जाहीर, नामदार गडाखांनी केली पाहणी,तालुक्यातील जनतेने काळजी घेण्याचे केले आवाहन

नेवासा - सोनई येथील १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने सोनई गाव हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहे. नामदार शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाय योजनेची माहिती घेतली असून सर्व संबधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली आहे.
३ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून सोनई येथे आलेल्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट केल्याने २० लोकांपैकी १० लोकांना कोरोनाची लागण झाल्याने तहसीलदार रुपेश सुराणा यांनी रात्रीच सोनई गावात येऊन उपाय योजना केल्या आहे.
शुक्रवार (दि १० जुलै ) रोजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनई गावात जाऊन पाहणी केली .यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी,शेवगाव पोलीस विभागाचे उप विभागीय अधिकारी मंदार जवळे,सोनई पोलीस ठाण्याचे सहायक अधिकारी जनार्धन सोनवणे उपस्थित होते.

नेवासा तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा. 👇
https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share

तालुक्यातील जनतेला आवाहन करतांना नामदार गडाख यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी सोनाईत एका व्यक्तीचे दुर्दवी निधन झाले असून सर्वांनी काळजी घ्यावी व तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे.
सोनईत हॉट स्पॉट घोषित केल्याने सर्व दुकाने बंद राहणार आहे.या काळात अत्यावश्यक सुविधा बाबत कशा प्रकारच्या उपाय योजना करणार आहे,कोरोना बाधित लोकांच्या कोण कोण संपर्कात आले आहे,किती व्यक्तींची तपासणी करणार आहे अशा विविध बाबीवर नामदार गडाख यांनी आधीकाऱ्यांशी चर्चा केली.
प्रतिनिधी- शंकर नाबदे नेवासा. मो.9960313029

No comments:

Post a Comment