ब्रेकिंग न्यूज : नेवासा - प्रवरासंगम मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला ; तालुक्यात २ मृत व्यक्तीं पॉझिटिव्ह.! | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 26, 2020

ब्रेकिंग न्यूज : नेवासा - प्रवरासंगम मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला ; तालुक्यात २ मृत व्यक्तीं पॉझिटिव्ह.! | C24Taas |

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम मध्ये कोरोना रुग्ण आढळला, तर
तालुक्यात २ मृत व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह.! | C24Taas |

नेवासा तालुक्यातील रविवारी १२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आगोदर मृत झालेल्या दोन व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे तर इतर दहा मध्ये जिल्हा रुग्णालयातुन दुपारी आलेल्या अहवालात ९ व्यक्ती बाधित आढळून आले होते. तर खाजगी रुग्णालयातुन १ आलेल्या अहवालात  माळेवाडी ( प्रवरा संगम ) येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.
मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींपैकी एक नेवासा शहरातील ७० वर्षीय व्यक्ती तर दुसरा कांगोनी येथील ६२ वर्षीय व्यक्ती आहे.
दरम्यान रविवारी सायंकाळी सलाबतपुर येथील २१,सोनई येथील १५ तर गिडेगाव,महालक्ष्मी हिवरा,जळके व मुकींदपूर येथील प्रत्येकी एक असे तब्बल चाळीस व्यक्तींना नेवासा येथील कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले.


शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇1 comment: