नेवासा - मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या २८ आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 23, 2020

नेवासा - मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या २८ आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. | C24Taas |

नेवासा - मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या २८ आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. | C24Taas |

नेवासा - मराठा आरक्षण आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या स्व. काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज गंगापुर तालुक्यातील कायगाव येथील गोदावरी पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना स्मृतिस्थळापासून काही अंतरावरच रोखून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले असून तहसीलदारांनी सरकारच्यावतीने मागण्यांसंदर्भात ३० तारखेला मंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत संपन्न झाले.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये कायगाव येथे स्व. काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकासाठी गोदावरी पुलानजीक जागा उपलब्ध करून देउन सुशोभिकरण करावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात यावी, आरक्षण आंदोलनात मृत्यू पावले ४२ आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देउन शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी आर्थिक तरतूद करणे, मराठा समाजाच्या विद्यार्थासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करणे, सारथी संस्थेचे उपविभागीय कार्यालयात मराठवाड्यात सुरू करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ५०० कोटी निधी द्यावा व मराठा आंदोलकांवरील १३ हजार ७०० गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. दरम्यान आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम असल्यावरून पोलिसांनी सर्व आंदोलकांना पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवून सोडून दिले.

याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने शिंदे कुटुंबियांना स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहण्यास परवानगी दिली होती त्यानुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास स्व. काकासाहेब शिंदे यांचे आई, वडिल, भाऊ, बहिण व चुलत्यांसह एकूण सहा जणांनी काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रवारासंगम येथील पुलावर अहमदनगर व औरंगाबाद पोलिसांनी कडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment