नेवासा - तालुक्यातील गिडेगाव येथे दि.२७ जून रोजी
अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्या प्रकरणी नेवासा पोलिसांनी मुलीच्या चुलत्याला अटक केली आहे. एक अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून गंभीर केले होते याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबावरून नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अल्पवयीन मुलगी घरातील फारशी पुसत असताना अचानक एका अज्ञाताने घरात घुसून तिच्या डोक्यावर,उजव्या व डाव्या हातावर तसेच तोंडावर व ओठावर वार केले. शनिवार ११ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार,अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे,उप अधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे,तपासी अधिकारी उपनिरीक्षक भरत दाते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून या प्रकरणाचा सर्वांगीने तपास केला. पोलीस तपासात या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या चुलत्यानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चुलत्याला अटक करून आज दि.१२ जुलै २०२० रोजी नेवासा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. १६ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरच्या आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला दि.२७ जुलै रोजी गु.र.नं. ३६७/२० भा.द.वी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत दाते हे करीत आहे.
❗ नेवासा तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा. 👇
No comments:
Post a Comment